Ticker

6/recent/ticker-posts

पोलिसांच्या अंगावर आरोपी तलवार घेऊन धावल्याने पोलिसांनी तीन गोळ्या झाडल्याची घटना



 रविंद्र गव्हाळे मलकापुर

मलकापूर : तडीपार व कुख्यात आरोपी अचानक शहरात दाखल झाला. तसेच त्याने डुकरे बांधण्यावरुन वाद घातल्यावर जखमी कुटुंबाला वाचवण्यासाठी पोलिसांचे डी. बी. पथक पोहोचले. मात्र त्यांच्याच अंगावर आरोपी तलवार घेऊन धावल्याने पोलिसांनी तीन गोळ्या झाडल्याची घटना म्हाडा कॉलनीत शनिवारी रात्री घडली.

शहरातील म्हाडा कॉलनीतील रहिवासी मनोजसिंह टाक ह्याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपात सुमारे २७ गुन्हे दाखल आहेत. दोनदा तडीपार झालेला आरोपी शनिवारी मलकापूर येथील म्हाडा कॉलनीत दाखल झाला. शनिवारी रात्री त्याचा म्हाडा कॉलनीतील रहिवासी ब्रम्हादे कुटुंबातल्या लोकांशी डुकरे बांधण्यावरुन वाद झाला. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यात ब्रम्हादे कुटुंबातील तिघे जखमी झाले. त्या संदर्भात माहिती कळताच पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या आदेशावरून डी.बी. पथक म्हाडा कॉलनीत दाखल झाले.