Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद निढळच्या शाळेची इमारत प्रेक्षणीय व सर्व सोयी सुविधानेयुक्त :चंद्रकांत दळवी



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

जिल्हा परिषद शाळा निढळ ची ईमारत अत्यंत प्रेक्षणीय झाली  आहे. येथे सर्व सोयीने सुसज्ज इमारत फिनोलेक्स कंपनीच्या मदतीने उभी राहिली आहे. येथील नवीन वर्गखोल्या, मुख्याध्यापक खोली व स्टाफ रूम आणि मुला मुलींसाठी स्वच्छतागृह हे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेतील एकमेव उदाहरण आहे. या पुढील काळात शाळेसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन  निढळ गावचे सुपुत्र  व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी  शिक्षक- पालक-विद्यार्थी मेळाव्यात व्यक्त केले.  

पुढे ते म्हणाले निढळ  या गावाने संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानामध्ये व महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम , जलसंधारण योजना,राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निढळ व निढळ हायस्कूल या पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये प्रथम येईल त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. या पुढील काळात तरुणांना स्पर्धा परीक्षेसाठी व नोकरीसाठी मी स्वतः मार्गदर्शन करीन असे त्यांनी सांगितले. माझ्या मातृभूमीत 41 वर्ष सातत्याने काम करत असून या पुढील काळातही सर्वांचे सहकार्याने कार्य चालू राहील . असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा निढळ वरिष्ठ मुख्याध्यापक दीपक भुजबळ यांनी  प्रास्ताविक केले.   संतोष खुस्पे यांनी स्वागत केले.  अशोक राऊत यांनी आभार मानले.