प्रतिनिधी जयदीप लोखंडे
10 सप्टेंबर वैजापूर तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब तात्या पाटील चिकटगावकर यांनी अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे त्यांनी या गटात 2 वर्षांपूर्वी प्रवेश केला होता व पक्षाची ताकद वाढवण्याचे कामही तालुका भरात सुरू होते मात्र मागील काही दिवसापासून चिकटगावकर अस्वस्थ असल्याचे बोलले जात होते त्यातच मागील महिन्यात झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाला चिकटगावकरांची अनुपस्थिती खूप काही सांगून गेली होती उबाठा गटात एका स्थानिक मोठ्या नेत्याचा प्रवेश होणार असल्याचे व त्यांनाच उबाठा कडून उमेदवारी मिळणार असल्याचे यावेळी चिकटगावकरांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी कार्यकर्त्यांची आज बैठक बोलावली होती त्या बैठकीत कार्यकर्त्यांनी उबाठा गटाची साथ सोडण्याचे कार्यकर्त्यांनी मला सांगितले असल्याचे चिकटगावकरांनी सांगितले जो निर्णय कार्यकर्त्याचा असेल तो मला मान्य असेल असे यावेळी त्यांनी सांगितले त्यामुळे उबाठा गटाला रामराम करून शरचंद्र पवार गट किंवा मनोज पाटील जरांगे यांच्याकडे आपण जाणार असल्याचे चिकटगावकर यांनी यावेळी सांगितले जर त्या दोन्हीही ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही तर तिसरा पर्याय आपण कार्यकर्त्यांना विचारून घेणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आपण कोणावरही टीका करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले मी स्वाभिमानी माणूस आहे व मला ज्यावेळी समजले की मला तिकीट मिळणार नाही त्यावेळी मी कार्यकर्त्यांना विचारून हा निर्णय घेतला असेही त्यांनी यावेळी सांगितले





Social Plugin