Ticker

6/recent/ticker-posts

वीरभूमी महीला प्रभाग संघ ओझर्डे ची वार्षिक सभा संपन्न



वाई प्रतिनीधी, राहुल पिसाळ 

       रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी उमेद अभियान अंतर्गत स्थापन वीरभूमी महिला प्रभाग संघ ओझर्डे यांची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा क्रांतीवीर देशभक्त किसन वीर सभागृह कवठे तालुका वाई येथे श्री प्रविण खुडे सर तालुका अभियान व्यवस्थापक  पंचायत समिती खंडाळा यांचे अध्यक्षतेखाली तसेच  श्रीमती पूनम गायकवाड मॅडम तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत  समिती वाई यांच्या प्रमुख  उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली. याप्रसंगी श्री खुडे सर  यांनी प्रभाग  संघाची सद्यस्थिती व पुढील वाटचालीच्या अनुषगाने विस्तृतपणे मार्गदर्शन केले.  

                       गायकवाड मॅडम यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन उपजीविकेच्या संधी याबद्दल मार्गदर्शन केले तसेच प्रभाग संघ कामकाजाचा आढावा घेतला. सदरहू कार्यक्रमात उमेद अभियान अंतर्गत कार्यरत व लखपती झालेल्या महिलांना प्रशस्तीपत्रक देऊन  मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले  या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी  श्री सागर अभंग तालुका व्यवस्थापक FI श्री सौरभ  फरांदे सर BM MIS वाई, श्री काशिनाथ कुंभार सर तालुका व्यवस्थापक FI खंडाळा, श्री स्वप्निल शिंदे सर IFC ब्लॉक अँकर, वाई, मा सौ  मंदाकिनी पोळ सरपंच ग्रामपंचायत कवठे हे उपस्थित होते, यावेळेस प्रभाग संघाच्या वार्षिक ताळेबंद  व कार्यक्रम अहवालास मंजुरी घेण्यात आली. सर्व  सन्माननीय प्रभाग संघ पदाधिकरी सौ.सुनंदा आण्णासाहेब फरांदे (अध्यक्षा) सुनिता राजू मोरे (सचिव) रेखा अमोल कदम (कोषाध्यक्ष), प्रभाग संघ कार्यकारिणी व सर्व ग्राम संघांचे पदाधिकारी  समूहातील अध्यक्ष सचिव सर्व , प्रभागातील गावांचे सी आर पी, कृषी सखी व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या*