प्रतिनिधी सतीश परदेशी
मनमाड येथील मध्य रेल्वे केंद्रीय विद्यालय मनमाड चा विद्यार्थी राजरत्न अर्जुन बागुल यांची केंद्रीय विद्यालय शालेय १७ वयगट खालील महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली. पुणे येथे केंद्रीय विद्यालय शालेय १७वयगट खालील महाराष्ट्र राज्य शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेमध्ये लखनौ येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी केंद्रीय विद्यालय शालेय १७ वयगट खालील राज्य क्रिकेट संघांची निवड करण्यात आली. या संघात मनमाड येथे केंद्रीय विद्यालय चा विद्यार्थी राजरत्न अर्जुन बागुल यांची निवड करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक विनोद माळी सर, क्रिडा शिक्षक मनोज मिना सर, वर्गशिक्षक पुणीत कुमार शिक्षक वर्ग आदिने अभिनंदन केले.राजरत्न बागुल हा भुमी क्रिकेट अकादमी मनमाड चा विद्यार्थी असून सिध्दार्थ रोकडे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे





Social Plugin