Ticker

6/recent/ticker-posts

क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त अभिवादन



 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयात आद्य क्रांतिकारक क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त मुख्याध्यापक आर.एम.डांगे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले .यावेळी कु. स्नेहल मदने , कृष्णा भंडलकर (इ. 5 वी ) यांची समयोचित भाषणे झाली. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.अविनाश जंगम आपल्या भाषणात म्हणाले, १८५७ पूर्वी ब्रिटिश साम्राज्याविरुध्द  सशस्त्र उठाव करणारे उमाजी नाईक हे पहिले क्रांतिकारक होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. 

छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून रयतेसाठी कार्य केले. आपली फौज निर्माण करुन, गनिमी कावा युद्ध तंत्राचा अवलंब करत  इंग्रज सरकारपुढे दरारा निर्माण केला . सामान्य लोकांची काळजी घेणारे राजे उमाजी थोर व्यक्तिमत्त्व होते. यावेळी सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. ज्येष्ठ उपशिक्षक श्री.सुनील वायदंडे यांनी आभार मानले.