Ticker

6/recent/ticker-posts

ईद-ए-मिलाद निमित्त देश सेवा फाउंडेशन जालना च्या वतीने राबविले विविध उपक्रम, उपक्रमाचे होवू लागले कौतुक



*देश सेवा फाउंडेशन अध्यक्ष शेख जावेद यांनी  वाटप केले २ क्विंटलचे लाडु*

अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

मुस्लीम धर्मियांच्या ईद ए मिलादुन्नबी या सणा निमित्त जालना शहरातील अलंकार चौक परिसरत ईद-ए-मिलाद निमित्त देशसेवा फाउंडेशनने लाडुचे वाटप,आणि पोलिस प्रशासनातील कर्मचार्‍यांचा सत्त्कार तसेच जुलूस मध्ये सहभागी झालेल्यांचा गौरव यासह अन्य उपक्रम देशसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख जावेद यांनी राबविल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

देशभरा मध्ये ईद मिलाद उन नबी हा मुस्लीम धर्मीयांचा सण दि.१६ सोमवार रोजी साजरा करण्यात आला.या सणा साठी शासनाने सुट्टी देखील जाहीर केली होती.परंतू जालन्यामध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस ऊशिराने म्हणजे गुरूवारी ईद मिलाद उन नबी हा सण साजरा केला.शहरात शांतता,जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी यामुळे मुस्लीम धर्मीयांनी आज गुरूवारी ईद मिलाद उन नबी हा सण साजरा केला.सामाजिक कार्यकर्ते शेख जावेद देशसेवा फाउंडेशन यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून ईद निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरातील अलंकार  चौक परिसरात शेख जावेद यांच्या दोन क्विंटल चे लाडु वाटप करण्यात आले.देशसेवा फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण अलंकार चौक परिसर शुभेच्छा फलकाने तसेच विद्यूत रोषणाईने झळाळून निघाला.ईद ए मिलाद उन नबी निमित्त शहरातील येथे समारोप झाला.दरम्यान अलंकार चौकात देश सेवा फाउंडेशन यांच्या वतीने जुलूस मध्ये सहभागी झालेल्यांचा सत्कार करण्यात आला.जुलूस मध्ये तरूणांसह नागरीकांची मोठ्या संख्येने ऊपस्थिती होती. 

 कार्यक्रमास ऊपस्थित राहून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.यावेळी माध्यमांशी बोलतान म्हणाले की,गणपती विसर्जन आणि ईद ए मिलादुन्नबी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने मुस्लिम समाजाने अत्यंत सामंजस्याची भूमिका घेत आपला सण तीन दिवसा नंतर साजरा करण्याचा जो निर्णय घेतला तो अत्यंत कौतुकास्पद असून यामुळे दोन्ही समाजामध्ये भाईचारा,शांतता प्रस्थापित होण्यास नक्कीच मदत होईल असे ते म्हणाले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देशसेवा वेलफेयर फाउंडेशनचं संस्थापक अध्यक्ष शेख जावेद भाई, इरफान पठान,शेख रफीक, इरफान शेख,सईद शेख,अब्दुल नईम,तबरेज अली,फहीम भाई,हारून शाह,अशफाक तंबोली,शेख रहीम,सोनू भाई,आमेर भाई, शेख शाहरुख ,अजीम खान, आरेफ सैयद, अकबर शेख, सिकंदर सैयद,मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.