Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा येथे मा. ना.श्री संजयभाऊ राठाेड यांची सहविचार सभा संपन्न


कारंजा येथे मृद व जलसंधारण मंत्री आदरणीय ना.श्री संजयभाऊ राठाेड यांची वसंतराव नाईक सामाजिक सभागृह बंजारा काँलनी कारंजा येथे पाेहरादेवी या ठिकाणी नंगारा म्युझियम लाेकार्पण साेहळ्याकरीता देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी माेदी साहेब हे दि.५ आँक्टाेंबर २०२४ ला येणार आहे.याबाबत सभेचे आयाेजन केले हाेते.

    आदरणीय श्री संजयभाऊ राठाेड यांनी कार्यक्रमाबाबत विस्तृत माहिती व मार्गदर्शन समाज बांधवांना दिले व कार्यक्रमाला उपस्थीत राहण्याचे आवाहण केले.

    या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भिकासिंगजी राठाेड नायक कारंजा तांडा,विचारपिठावर श्री.शालीग्रामजी राठाेड माजी सरपंच महागाव,डॉ.महेश भाऊ चव्हाण(अस्थिरोग तज्ज्ञ ) ,श्री अशाेकरावजी राठाेड (माजी सभापती),प्रा.विलासभाऊ राठाेड (राष्ट्रीय अध्यक्ष,राष्ट्रीय बंजारा परिषद),प्रा.श्री टी.व्ही.राठाेड (राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय तांडा सुधार समिती),प्राचार्य श्री वसंतराव राठाेड यांची उपस्थीती हाेती.या प्रसंगी श्री विलासभाऊ राठाेड,प्रा वसंतराराठाेड,श्रीकांतजी चव्हाण(मा.सरपंच)यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे संचलन प्रा.मदनभाऊ जाधव तर आभार प्रदर्शन प्राचार्य श्री टी.व्ही.राठाेड यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेकरिता श्री विष्णुभाऊ आडे कारंजा, श्री.अनुभव चव्हाण,डाँ.गुणवंत राठाेड महागाव,श्री गाेपाल आडे अंतरखेड,श्री रमेश पवार,श्री वैभव चव्हाण व डॉ.महेश चव्हाण मित्र मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला कारंजा तालुक्यातुन बंजारा समाज बांधव बहुसंख्येंने उपस्थीत हाेते.