*सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन*
अंबड प्रतिनिधीगणेश सपकाळ
:- दि.२२ रोजी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अंबड शहर कडकडीत बंद ठेवून मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना आपल्या हक्काचे ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील एक वर्षापासून सातत्याने आमरण उपोषण करत आहेत.त्यामध्ये त्यांनी सरकारकडे वाशी मध्ये दिलेल्या आधीसूचनेच कायद्यात रूपांतर करून सगे सोयऱ्याचा कायदा लागू करणे, हैद्राबाद गॅझेट लागू करणे, सातारा संस्थान गॅझेट लागू करणे, बॉम्बे गॅझेट लागू करणे,मराठा व कुणबी एकच आहेत अंतरवाली सराटी सह महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आंदोलन कर्त्यांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागण्या संदर्भात अंबड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी अंबड शहरासह परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकाना दिवसभर कडकडीत बंद ठेवून व्यापारी वर्गाने सर्व समाज बांधवांनी बंदला प्रतिसाद देऊन सहकार्य केले आहे.





Social Plugin