तालुका प्रतिनिधी शंकर निंबारे
ठाणापाडा | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बॅंक र्ऑफ महाराष्ट्र शाखा ठाणापाडा येथे मागील जुलै महिन्यापासुन सुट्टीचे दिवस वगळता दररोजच बॅंकेत केवायसी आणि पासबुकवर एन्ट्री मारण्यासाठी ऊन पावसात लाडकी बहिणीसह आजी- आजोबांच्या रांगांच्या रांगा. पासबुला बारकोड सह एन्ट्री मशीनची बॅंक खातेधारकांनी मागणी केली आहे.
ठाणापाडा गटातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बंद झाल्याने बॅंक र्ऑफ महाराष्ट्र हि एकच बॅंक असुन ठाणापाडा गटातील सर्व ग्रामपंचायतीच्या जास्तीत जास्त नागरिकांनी बॅंक र्ऑफ महाराष्ट्र शाखेत खाते उघडले. ठाणापाडा शाखेतील पुर्वी चे खातेंची केवायसी अपडेट असल्याने बॅंक सेव्हिंग खातेधारक, विद्यार्थी शिष्यवृत्ती, लाडकी बहिण, पीएम किसान, वृद्धापकाळ या खातेधारकांना पैसे काढण्यासाठी अडचणी आल्या. बॅंकेत केवायसी साठी काहींनी दोन तीन वेळा आधार कार्ड, फोटोसह अर्ज देवून ही वेळेवर केवायसी होत नाही. एक, दीड महिन्यात केवायसी न झाल्याने लाडकी बहिणीसह आजी -आजोबांच्या चेह-यावर निराशा दिसून आली. परत ऊन पावसात अनशापोटी बॅंकेच्या दाराशी रांगेत उभे राहून बॅंक प्रशासनास सहकार्य करतात. ऊन पाऊसातील रांगा कमी करण्यासाठी बॅंकेकडुन पासबुकला बारकोड तसेच एन्ट्री मशीन उपलब्ध करून देण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे.





Social Plugin