गेंड्याची कातडी घालून बसलेले तहसीलदार यांचे दुर्लक्ष
अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
तहसील कार्यालयासमोर दि.१३/०९/२०२४ शुक्रवार पासून शेतकऱ्याचे आमरण उपोषण उपोषणाचा चौथा दिवस असून अंबड तहसीलदार यांचे उपोषण कर्त्याकडे दुर्लक्ष सविस्तर वर्ता असे की पाथरवाला बु.येथील शेतकरी नामे श्रीरंग पांडुरंग निर्मळ हे वडीलांच्या नावे स्वताची जमीनी मधून ५४ आर जमीन सातबाऱ्यावरुन गायब झाल्यामुळे जमीन तात्काळ सातबारा दुरुस्ती व मोजमाप करुन मिळुन न्याय मिळणे बाबत निवेदनात म्हटलेले आहे.मौजे कुरण शिवारातील गट क्रं. ९१ सर्व्हे नंबर ५१ मधील जमीन नामे पार्वती श्रीपती निर्मळ यांच्या नावे फेरफार क्रं.८ यावर एकुण जमीन १ हे ६५ आर असून सातबाऱ्यावर जमीन १ हे ११ आर जमीन दाखवत आहे.माझी ५४ आर जमीन सातबाऱ्यावरुण गायब झालेली असून तलाठी,मंडळ अधिकारी हे उडवा उडवीचे उत्तर देत असून माझ्या कुंटुंबाचा उदरनिर्वाह त्याच शेतीवर असून ती जमीन तात्काळ मोजमाप करुन मला १ हे ६५ आर जमीनीचा सातबाऱ्यावर फेरफार नोंद करून न्याय मिळावा यासाठी मी चार दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहे.मला सातबारा दुरुस्ती करून द्यावा अशी मागणी घेऊन चार दिवसापासून तहसील कार्यालय समोर श्रीरंग पांडुरंग निर्मळ उपोषण करीत असून मला न्याय मिळेपर्यंत उपोषण चालू राहील.





Social Plugin