दिनांक 9/ 9 /2024 वेळ सकाळी 10:00 आज ग्राम गायवळ येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र गायकवाड यांच्या सेंद्रिय शेती युनिटला चांदूरबाजार येतील शेतकऱ्याच्या टीमसह मनोज भिमराव वानखडे निवृत्त कृषी अधिकारी चांदूरबाजार व अमोल प्रभाकर धोटे पंचायत समिती इंजिनियर चांदुर बाजार सोहेल परवेज ,परवेज इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड अमरावती व रोशन अशोकराव वडे रा. मासोद ,पवन भैय्यासाहेब कीटुकले रा.मासोद तालुका चांदूरबाजार यांच्यासह शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती प्रोजेक्टला व्हिजिट दिली यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख गांडूळ खत निर्मिती प्रकल्प व प्रशिक्षण केंद्र गायवळ येथे सेंद्रिय शेती उत्पादन विक्री व्यवस्थापन या विषयावरती कार्यशाळा पार पडली
वाशिम ऑर्गानिक मिशन महासंघ फॉर्म प्रोडूसर कंपनी सोबत अमरावती येथील कंपनी काम करणार व विषमुक्त अन्न व भाजीपाला अमरावती सह वाशिम जिल्हा तसेच पुणे व मुंबई येथे व विदेशात सुद्धा पाठवण्याबाबत नियोजन करण्यात आले या करिता शेतकऱ्यांना शेडनेट हाऊस मध्ये विषमुक्त भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त नैसर्गिक निविष्ठाचा वापर करून रवींद्र गायकवाड शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणार आहे व विक्री व्यवस्थापन साखळी करिता मनोज भीमराव वानखडे व सोहेल परवेज यांची कंपनी खूप मोठे काम करणार आहे व जैविक शेतीमध्ये वेगळा इतिहास रचला जाणार आहे याबाबत सेंद्रिय शेतमाल विक्री व्यवस्थापन व नियोजन चालू आहे
या करिता आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली ही बैठक डॉ. पंजाबराव देशमुख गांडूळ खत निर्मिती प्रकल्प व प्रशिक्षण केंद्र गायवळ या ठिकाणी संपन्न झाली सदर बैठकीदरम्यान परवेश सोहेल व मनोज वानखडे सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी चांदूरबाजार आणि रवींद्र गायकवाड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले . कार्यशाळेचा समारोप रवींद्र गायकवाड यांच्या सेंद्रिय शेतीमधील रोज पैसे देणारी शेती प्रकल्प मध्ये देशी गोपालन ,बायोगॅस निर्मिती, गांडूळ बीज निर्मिती, देशी कुक्कुटपालन अंडे उत्पादन, भाजीपाला व फळ रोपवाटिका पाहून करण्यात आला. कार्यशाळा पार पाळण्याकरता किरण निचडे यांनी परिश्रम घेतले . शेवटी रविंद्र गायकवाड यांची सेंद्रिय शेती गायवळ चे फाॅर्म म्हणजे मिनी कॄषि विद्यापीठ आहे असे उद् गार कॄषि अधिकारी मनोज वानखेडे यांनी काढले





Social Plugin