तालुका प्रतिनिधी: शंकर निंबारे
ओझरखेड | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत ओझरखेड येथील उपकेंद्रासह प्राथमिक शाळेच्या इमारतीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम असल्याने सलाप गळका असुन याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
गावाच्या मुलभूत गरजा शिक्षण, आरोग्य ह्या सुविधांचा लाभ उपकेंद्रात आणि शाळेत मिळत असुन दोन्ही ठिकाणच्या इमारती पावसाळ्यात थोडासा पाऊस आल्यास इमारतींत पाणीच पाणी साचते. छप्पराचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम असल्याने सलाप गळका झाला असून पेंसंटच्या उपचारादरम्यान पाऊस आल्यास छत्रीचा आधार घ्यावा लागतो असे स्थानिकांकडून समजले. तसेच विद्यार्थ्यांना वर्ग खोली सोडून व्हरांड्यात किंवा वर्ग खोलीच्या भिंतीचा आधार घेऊन बसावे लागते. या समस्या ग्रामपंचायतीला वारंवार पाठपुरावा करूनही लक्ष देत नाही. मागील महिन्यात जोरदार पावसाने उपकेंद्र व शाळेची इमारतीला गळती असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिले असता या समस्याचे निवारण करतांना प्रशासनाकडे सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून मागितले असता इतकी रक्कम आणणार कोठून असे अभियंत्याने सांगितले असल्याचे उपसरपंच काळु गवळी यांनी ग्रामस्थांना सांगितले तसेच तात्काळ दोन्ही इमारतीच्या सलापवर तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था मेनकापड चढवून आठ दिवसांत व्यावस्था करण्यात येईल असे ग्रामपंचायतीच्या वतीने आश्वासन देण्यात आले होते परंतु अद्याप ही व्यवस्था करण्यात आली नाही. फक्त आश्वासन देवून तात्पर्य समाधान करतात हि बाब दुर्दैवी आहे. अशी सामाजिक कार्यकर्ता मनोज वाजे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य कर्मचारी वृंद तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.





Social Plugin