Ticker

6/recent/ticker-posts

महंतामुळे प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला अखेर यश



प्रतिनिधी--संजय भरदुक मंपीर 

        मंगरूळपीर --विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती च्या वतीने गेल्या चार वर्षापासून विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या प्रमुख मागण्या १) सन २००६ ते २०१३ मधील सरळ खरेदी धारक प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना सन २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला देणे. 

२) प्रकल्पग्रस्तांचे ५℅ चे समांतर आरक्षण १५℅ करण्यात यावे, तसेच महाराष्ट्र पुनर्वसन कायद्याप्रमाणे विस्तापीत कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामाऊन घेणे, ते शक्य नसल्यास एकरकमी २० लक्ष रुपये देण्यात यावे. या मागणीसाठी संघटनेच्या वतीने प्राणांतिक उपोषण, मोर्चे, नागपूर हिवाळी अधिवेशन वर मोर्चा, आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन, विदर्भातील सर्व जिल्ह्यात मोर्चे याप्रकारे आंदोलन झाले. 

    दि. २६ सप्टेंबर रोजी मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे नियामक मंडळाची बैठक पार पडली. या बैठक मध्ये विदर्भातील सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदी ने संपादीत करण्यात आलेल्या जमीनीला सन २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला देण्याचे निश्चित केले त्यानुसार अमरावती विभागातील वाशीम, अकोला,यवतमाळ,बुलढाना अमरावती हे जिल्हे व नागपूर, विभागात ली वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांतील १६६३३ हेक्टर जमीनीला ८३२ कोटी रुपये सानुग्रह अनुदानास विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ च्या नियामक मंडळाची मान्यता मिळाली. त्यानुसार हेक्टरी पाच (५) लक्ष रुपये दराने सानुग्रह अनुदान मिळणार आहे. 

            आजपर्यंत एवढी लढाई संघटनेच्या वतीने करून कोणत्याही आमदार, खासदार यांचे म्हणणे उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मनावर घेतले नाही. बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबुसिंगजी महाराज यांनी विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी दि. २५ जुन २४ ला ना. फडणवीस साहेब यांच्या सागर बंगल्यावर समिती शिष्टमंडळ समवेत बैठक आयोजित केली. 

            या बैठकीत ना. फडणवीस साहेब यांनी महंत बाबुसिंगजी महाराज यांना शब्द दिला की, आपण सांगितलेले काम मी पार पाडून प्रकल्पग्रस्तांना न्याय देईन. यावेळी समिती शिष्टमंडळ उपस्थित होते. यानंतर दि. ९ सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचा मेळावा ना. फडणवीस साहेब यांच्या सागर बंगल्यावर होता त्या कार्यक्रमास महंत बाबुसिंगजी महाराज व समिती शिष्टमंडळ उपस्थित होते यावेळी सुद्धा महंत यानी या कामाचा ना. फडणवीस साहेब सोबत पाठपुरावा केला. 

   अशाप्रकारे तिन ते चार वेळा महंत यांनी शासना सोबत पाठपुरावा केला. यामुळे आज पोहरागड येथे बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबुसिंगजी महाराज यांचा यथोचित सत्कार विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती चे जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे,समिती पदाधिकारी शिवदास पाटील ताठे,बाबुसिंगजी पवार ,संजय भरदूक यांनी केला. यावेळी महंत बाबुसिंगजी महाराज यांनी सांगितले की, प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी ५ लक्ष रुपये अनुदान मध्ये वाढ मिळण्यासाठी मी ना. फडणवीस साहेब यांना बोलुन प्रयत्न करेल. व या कामाची घोषणा पोहरागड येथे शासनाच्या वतीने करण्यात येईल असे महंतांनी बोलतांना सांगितले. 

          या कार्यक्रमास यवतमाळ जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र जाधव, अकोला जिल्हाध्यक्ष सौ. मनिषाताई चक्रणारायन, रविंद्र श्रृंगारे, सह वाशीम, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यातील हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुखतार खान पटेल यांनी केले.