Ticker

6/recent/ticker-posts

गायवळ येथील शेतकरी राज्यपालांकडून सन्मानित



प्रतिनिधी --संजय भरदुक मंपीर 

मंगरुळपीर--दि.29/09/24 मुंबई येथे नुकताच पार पडलेला कृषी सन्मान सोहळा या ठिकाणी ग्राम गायवळ येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र गायकवाड यांना 2021 चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार माननीय राज्यपाल सिट पी राधाकृष्णन व कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषी आयुक्त यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला ग्राम गायवळ येतील शेतकरी रवींद्र गायकवाड यांचे नैसर्गिक शेतीमधील उल्लेखनीय कामगिरीची राज्यपालन दखल घेतली आहे . कृषी क्षेत्रामधला राज्य शासनाचा मानाचा पुरस्कार वाशिम जिल्ह्याला 2021 या वर्षामध्ये रवींद्र गायकवाड यांना मिळाला पुरस्काराचे स्वरूप 44000 रोख व सन्मानपत्र तसेच वेलकम किट नी सन्मानित करण्यात आले.