( प्रतिनिधी - शैलेश कावळे )
लाखांदूर तालुक्यातील मौजा मांडळ या गावांमध्ये बाल गणेश मंडळ यांच्या सहकार्याने सांस्कृतिक कार्यक्रम मराठ मोळी लावण्याचा कार्यक्रम करण्यात आला व सर्व गावकरी एकत्र येऊन उत्साहाने मस्कर्या गणपती निमित्त कार्यक्रम करण्यात आले या वेळी कार्यक्रमाचे उदघाटक माझी जिल्हा परिषद सदस्य तथा बाजार समिती संचालक मा.मनोहरजी राऊत,अध्यक्ष मा.देवचंदभाऊ कावळे शिवसेना लाखांदूर तालुका प्रमुख .मांडळ येथील सरपंच मा.आळकिणेजी, सामाजिक कार्यकर्त्या सै.शहारे ताई, रामाजी धकाते तथा मांडळ येथील प्रतिष्ठित मान्यवर आणि बहुसंख्येने उपस्थित माता भगिनी व गावकरी होते.
या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष मा .देवचंदभाऊ कावळे शिवसेना लाखांदूर तालुका प्रमुख हे गावातील एकत्ता व गावातील विकास करायचा आहे तर आपण एकत्र येऊन केला पाहिजे.आपण इतर सामाजिक कार्यात सुध्दा एकत्र येऊन कार्य करतो त्याच प्रमाणे आपण इतर कार्यात सुध्दा एकत्र येवून गावाचा विकास सुध्दा करु शकतो, आपल्या हाताची बोटे लहान मोठे असते तरी पण ते एकत्र आले तर त्यांची एक संघटना तयार होते त्याच प्रमाणे आपण वेग वेगळ्या ठिकाणी विखुरलेले असलो तरी पण गावाच्या विकासासाठी एकत्रित येऊन एक होणे गरजेचे आहे तरच गावाचा विकास होतो.या विषयावर मार्गदर्शन केले आणि गावात झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांना नोटबुक बक्षीस देऊन स्पर्धकांचे कौतुक करण्यात आले.





Social Plugin