बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
काँग्रेस नेते राहुल गांधी व काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी आरक्षण बंद करण्यात यावे, या बेताल वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीने जाहीर निषेध करून तहसिलदार यांना निवेदन दिले . निवेदनात पुढे म्हणाले की ,काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यावर दरम्यान आम्ही सत्तेत आल्यावर आरक्षण संपवण्याची इच्छा व्यक्त केली. या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. ज्यांनी निवडणुकी आधी संविधान वाचवण्यासाठी मते मागितली त्यांनीच आज दलित ओबीसी एसटी या सर्व बहुजन समाजाच्या आरक्षण काढून घेण्याचा निर्णय सत्तेवर आल्यानंतर घेणार असे पत्रकार समोर जाहीर केले.
जोपर्यंत भारतीय संविधान आहे तोपर्यंत आरक्षण कायम राहणार .ज्यांचा आरक्षणाला व संविधानाला विरोध असणाऱ्या सत्तेवर येऊ देणार नाही.ज्यांनी आरक्षणाला विरोध केला आहे त्यांनी दलित समाजाकडे मते मागायला येवू नये. तसेच काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी देखील आरक्षण बंद करण्याची गरज आहे. या वक्तव्याचा जाहीर निषेध काँग्रेसने नेत्यांनी बेताल वक्तव्य थांबवावी. अन्यथा दलित बहुजन समाज रस्त्यावरून तीव्र आंदोलन करेल हे वंचित बहुजन आघाडी खटाव तालुका नेते गणेश भोसले, पँथर ग्रुप चे अध्यक्ष भगवान मोरे, सचिन शिंदे, संदिप काळे, मिलिंद निकाळजे, जितेंद्र सोनवले, प्रकाश भोसले, कैलास पवार, संतोष बरकडे इ. उपस्थित होते.





Social Plugin