Ticker

6/recent/ticker-posts

सेवागिरी विद्यालयाचे कबड्डी स्पर्धेत यश



 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेसावळी येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत 17 वर्ष वयोगटातील  मुलींच्या स्पर्धेत पुसेगाव येथील श्री सेवागिरी विद्यालयातील इयत्ता 8 वी ते 10 वीच्या वर्गातील कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. याबद्दल मुख्याध्यापक ए. बी. सावंत, पर्यवेक्षक एस. डी. सावंत, स्थानिक स्कूल समिती, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, गुरुकुल विभाग, माता पालक संघ शिक्षक पालक संघ व शाळेतील सर्व शिक्षक व सेवक तसेच ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.