नाशिक ,प्रतिनिधी ,अमन शेख,
स्वच्छता ही सेवा' उपक्रमाअंतर्गत स्वच्छता कर्मचारीयांच्यासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्तमप्रतिसाद लाभला. या स्पर्धेत नाशिकरोड विभागाच्या संघाने विजेतेपदप्राप्त केले घनकचरा मुख्यालय संघ द्वितीय स्थानी राहिला. राष्ट्रपतामहात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १७ सप्टेंबर २०२४ ते २ ऑक्टोबर२०२४ या कालावधीत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हा स्वच्छतापंधरवडा संपूर्ण देशभरात केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राबविण्यात येतआहे.
तर नाशिक महापालिकेमार्फतही विविध उपक्रम राबवून साजराकरण्यात येत आहे. स्वच्छता पंधरवडा अनुषंगाने मनपा घनकचराव्यवस्थापन विभागाच्या मनपाच्या सर्व विभागातील सफाई सेवकांसाठीक्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्व विभागीयकार्यालय यांच्या एक व घनकचरा मुख्यालय यांचा एक अशा एकूण ७संघांनी भाग घेतला होता.





Social Plugin