नाशिक ,प्रतिनिधी ,अमन शेख,
। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठाव ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाप्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यामार्गदर्शनाखाली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना, अन्नपूर्णायोजना, मुलींचे मोफत शिक्षण यांसारख्या नवनवीन विविध योजनांचीमाहिती देऊन महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजनराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश चिटणीस डॉ. निर्मला सावंत यांनीकेले.
यावेळी पंचवटी ते मखमलाबाद रस्त्यावर नाशिकच्या महिलांनीगुलाबी थीमने मानवी साखळी तयार करून विविध कल्याणकारीयोजनांचे फलक हातात घेऊन राष्ट्रवादी अजितदादांचा वादा, लाभ आणिबळ, राष्ट्रवादीचा वादा, धन्यवाद दादा, अशा घोषणा देत परिसर दणाणूनसोडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोतीराम पिंगळे, विनायात खाँ पटेल,नामदेव मोहनकर, महिला कार्यकर्त्या माधुरी एखंडे, गायत्री सावंत आदीमोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
%20(1).jpeg)




Social Plugin