नाशिक ,प्रतिनिधी ,अमन शेख,
नाशिक जिल्ह्यात डाळिंब आणि बीड जिल्ह्यात सीताफळ इस्टेटस्थापन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतघेण्यात आला. या निर्णयानुसार मालेगाव येथील तालुकाफळरोपवाटिका निळगव्हाण येथे डाळिंब इस्टेट स्थापन करण्यातयेईल. यासाठी ३९ कोटी ४२ लाख ७५ हजार रुपयांची तरतूदकेली जाईल. तर बीड जिल्ह्यात मौजे वडखेल (ता.परळी) येथेसीताफळ इस्टेट स्थापन करण्यात येईल. त्यासाठी ५३ कोटी६० लाख २५ हजार रुपयांची तरतूद केली जाईल. या दोन्हीठिकाणी आवश्यक असे मनुष्यबळ प्रतिनियुक्ती आणि बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यतादिली.
%20(2).jpeg)




Social Plugin