(लाखांदुर प्रतिनिधी - शैलेश कावळे)
लाखांदूर तालुक्यातील डोकेसराडी येथे महिला दुर्गा मंडळाच्या माध्यमातून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे.या मंडळाच्या वतीने गावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत असुन दिवसांच्या कार्यक्रमात विविध स्पर्धा व रात्रोला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात असल्याचे नियोजन या मंडळांनी ठरविले आहे.
आपला गाव आपला परिसर स्वच्छ कसा ठेवायचा आपल्या मुलांना व परिसरातील मुलांना सुध्दा स्पर्धेत सहभागी करुन समोर स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन मुलांना चांगले संस्कार कसे घडविले जातिल.हे या डोकेसंराडी येथिल महिला मंडळींनी या नवरात्रीमध्ये करण्याचे ठरविले आहे.
या मंडळाने दिनांक 04/10/2024 रोजी सुंदर असा मराठ मोळी लावण्याचा कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमा निमित्त दुर्गामातेचे दर्शन घेण्यासाठी शिवसेना लाखांदूर तालुका प्रमुख मा.देवचंदभाऊ कावळे येथे उपस्थित होते.यावेळी मंडळाचे अध्यक्ष सौ. ज्योतीताई राजुजी तोंडरे, उपाध्यक्ष सौ.छबीलाताई दुधरामजी भरणे,सचिव सौ.सुनिताताई अशोकजी दुरुकर, कोषाध्यक्ष सौ.आशाबाई खेडिकर,व मंडळातील सदस्य सौ.स्नेहाताई राऊत,सौ.रिनाताई बेंदरे,सौ. भाविकाताई नखाते, आशाताई हटवार,सौ.प्रभाताई मिसार,सौ.पंचाबाई भुरले,सौ.शालुताई कावळे,व या मंडळाला सहकार्य करणारे मा.नरेशभाऊ ठाकरे.,उमेशजी राऊत,राजुजी मिसार,संदिपजी राऊत, अशोकजी दुरुकर व प्रमोदजी नागमोती उपस्थित होते.
नवरात्र उत्सवा निमित्ताने दिनांक 04/10/2024 रोजी मातांचे जागरण म्हणून कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना लाखांदूर तालुका प्रमुख मा.देवचंदभाऊ कावळे यांनी अध्यक्षीय भाषणातुण मार्गदर्शन केले कि आजही महीला पुरुषांपेक्षा कमी नाही.या माझ्या बहिणि घरच नाही तर गावाला सुध्दा विकासाच्या दिशेने नेवु सकतात व नारी सक्ती हे सर्वात मोठी शक्ती आहे.आणि हे डोकेसंराडी येथिल या माझ्या बहिणीने दाखवीले असे मार्गदर्शन केले आणि डोकेसंराडी येथिल महिलाचे शिवसेना लाखांदूर तालुका प्रमुख मा.देवचंदभाऊ कावळे यांनी अभिनंदन केले.





Social Plugin