Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी शिक्षकाला अटक


संतोष झाडे चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात बदलापूर सारख्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने जिल्हा हादरून गेला. खासगी शाळेत शिकणाऱ्या वर्ग 6 वी च्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेतील शिक्षकाने अत्याचार केला व सदर बाब कुणाला सांगितली तर तुझ्या आई-वडिलांना जीवे मारू अशी धमकी दिली. मात्र घडलेला प्रकार मुलीच्या कुटुंबाला कळताच त्यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. विशेष म्हणजे आरोपी अमोल लोडे याला नुकतेच कांग्रेस पक्षाने कोरपना युवक कांग्रेस शहर अध्यक्षपदी नियुक्त केले होते, आरोपीने अल्पवयीन मुलीला गुंगीच्या गोळ्या देत अत्याचार केले होता, सदर घटना ही मे महिन्यातील आहे. घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास तुझ्या आई-वडिलांना जीवे मारू अशी धमकी अल्पवयीन मुलीला दिली, त्या धमकीला घाबरत पीडित मुलीने ही बाब कुटुंबियांना सांगितली नाही मात्र हा प्रकार तिने मैत्रिणीला सांगितला.

पीडित मुलीच्या मैत्रिणीने ही बाब मुलीच्या आई-वडिलांना सांगितली आणि अत्याचाराचे बिंग फुटले, याबाबत कोरपना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होताच आरोपी शिक्षक अमोल लोडे पसार झाला. पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी तात्काळ आरोपीला अटक व्हावी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तात्काळ पथकाला पुढील कारवाई करण्यास सांगितले.

आरोपी अमोल लोडे हा अकोला बस स्थानकावर असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली आरोपी हा मुंबई पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली.सध्या कोरपना शहरात तणावाचे वातावरण सुरू असून आरोपीला फाशी द्या अशी मागणी जनसामान्य नागरिक करीत आहे, आज शाळकरी मुलांचा निषेध मोर्चा निघाला, 3 ऑक्टोबर रोजी कोरपना येथे सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे.

युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी अमोल लोडे यांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याचे पत्र जारी केले. या प्रकरणात अजून कुणी पीडित असेल त्यांनी पुढे येत तक्रार करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.