Ticker

6/recent/ticker-posts

ललगुण येथे कोरेगाव - खटावच्या आजी -माजी सैनिकांचा मेळावा उत्साहात संपन्न



बुध   दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

 कोरेगाव - खटावच्या आजी माजी सैनिकांचा मेळावा ललगुण ता खटाव येथील केदार मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. हजारोंच्या संख्येने दोन्हीं तालुक्यातील  माजी सैनिक यावेळी उपस्थीत असल्याची माहिती सैनिक संघटनेचे सातारा जिल्हाउपाध्यक्ष प्रा . शंकरराव खापे यांनी दिली.

         ना.महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास   शिवसेना सैनिक आघाडी चे प्रदेशाध्यक्ष  मनोजकुमार डांगे सूर्यवंशी  यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इंद्रजीत भिलारे  सरचिटणीस डॉ संजय लावंड ,जिल्हाअध्यक्ष  निलेश निकम संजय निंभाळकर सचिव निलेश साबळे व सातारा उप-जिल्हाअध्यक्ष पदी शंकरराव खापे , कोरेगाव तालुका अध्यक्ष्य भानुदास घोरपडे, तालुका ग्रामीण सागर सुतार तालुका कार्याध्यक्ष महादेव भोसले, खटाव तालुका अध्यक्ष अरुण जाधव ,तालुका ग्रामीण संतोष निकम, तालुका कार्याध्यक्ष बाबासाहेब शिंदे तालुका संपर्कप्रमुख हनुमंत वाघ तालुका ग्रामीण संपर्क प्रमुख सचिन तोडकर उपस्थिती होती.


यावेळी दोन्हीं तालुक्यातील हजारों आजी माजी सैनिकांनी शिवसेना सैनिक आघाडी मध्ये पक्ष प्रवेश केला . सैनिकांच्या पाठीशी असणाऱ्या शासनाला  आणि ना महेश शिंदे यांना आगामी निवडणुकीत प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा  ठराव यावेळी करण्यात आला.