प्रतिनिधी -कोमल नाकाडे
वर्धा जिल्ह्यामधील पारडी या गावातील रोडची अत्यंत दूर व्यवस्था झालेली आहे.रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे नागरिकांना आहे. रोज या रस्त्यावर हजारो नागरिक प्रवास करत असतात. मुलं मुली शाळेला व कॉलेजला जाताना यांना खूप त्रास होत असतो.
या रस्त्यावर रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत नागरिकांना महिलांना या रस्त्यावर वाहन चालवणे कठीण झाले आहे रस्त्यावर दोन चाकी चालवणे म्हणजे तारेवर कसरत केल्यासारखे आहे अनेक वेळा रस्ता दुरुस्त करण्याचा पाठपुरावा करून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे गेल्या बारा वर्षापासून असुरक्षिततेत हा रस्ता कधी बनणार हा प्रश्न युवा पिढीला पडला आहे मी विनंती करते की पार्डी या गावातील ग्रामपंचायतला व सरकारला या गोष्टीकडे लक्ष द्यावे.





Social Plugin