गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
दि. १ ऑक्टोंबर २०२४ रोजी पंचायत समिती कारंजा (लाड) येथे आशा वर्कर्स यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महेश भाऊ चव्हाण आणि डॉ. सौ. निकिता महेश चव्हाण यांची उपस्थिती होती.
बैठकीत डॉ. निकिता चव्हाण यांनी महिला आरोग्याविषयी सखोल माहिती दिली, तसेच या सत्रात त्यांनी महिला आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर देखील चर्चा केली.डॉ. महेश चव्हाण यांनी आगामी ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी आयोजित निःशुल्क महाआरोग्य शस्त्रक्रिया शिबिराबद्दल माहिती दिली. त्यांनी सर्व आशा वर्कर्सना ही माहिती अधिकाधिक गरजू आणि गरीब लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.तसेच त्या ठिकाणी टी.बी. रुग्णांना दत्तक घेऊन डॉ.महेश चव्हाण मित्र मंडळ कारंजा - मानोरा तर्फे प्रोटीन पावडर वाटप करण्यात आले.
या बैठकीला डॉ. नांदे (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ. प्रभनकर (क्षयरोग नियंत्रण अधिकारी), समाधान लोनसूने (जिल्हा कॉर्डीनेटर), आर. जी. मुंदे (आरोग्य सेवक पंचायत समिती कारंजा), निलेश पाटील (क्षयरोग सुपरवायझर), बर्वे साहेब (क्षयरोग सुपरवायझर), मंगेश भाऊ मुंदे (शिवसेना तालुका प्रमुख), उमाटे साहेब (कॅम्प इन्चार्ज), डॉ. गुणवंत राठोड, अनुभव चव्हाण, गफार गारवे यांच्यासह अनेक आशा वर्कर्स बहुसंख्येने उपस्थित होते.





Social Plugin