नाशिक ,प्रतिनिधी ,अमन शेख
नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय आणि रुग्णालय राज्यसरकारकडे घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतघेण्यात आला. १०० विद्यार्थ्यांचे तसेच ४३० रुग्ण खाटांचे हेरुग्णालय स्थापन करण्यास २०२१ मध्ये मान्यता देण्यात आलीहोती. परंतु राज्य सरकार आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठयांच्या दुहेरी नियंत्रणामुळे प्रशासनात अडचणी येत होत्या.त्यामुळे नाशिकचे वैद्यकीय महाविद्यालय सरकारकडे घेण्याचानिर्णय घेण्यात आला.
आता या महाविद्यालयाचे नाव शासकीयवैद्यकीय महाविद्यालय, नाशिक असे करण्यात येईल. तर महाराष्ट्रपदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था, नाशिक हीसंस्था महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियंत्रणात राहील.या रुग्णालयासाठी लागणाऱ्या ६३२ कोटी ९७ लाख खर्चासमंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
.jpeg)




Social Plugin