सुपतगाव- प्रतिनिधी.
उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथे शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त येथील देवी मंदिरात श्री जय भवानी सार्वजनिक नवरात्र मंडळाच्या वतीने विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली.
या नवरात्र महोत्सवात दररोज देवीची पूजा, अभिषेक, आरती नित्यनेम चालू असून, आराधी गाणे, तसेच सोमवार दि.7 रोजी संध्याकाळी आठ वाजता भक्ती सुमन कला मंच उमरगा प्रस्तुत "स्वार्थी दुनिया " ह्या एकांकिका नाटिकेचे आयोजन, मंगळवारी दि.8 व9रोजी आराधी गीत , गुरुवारी 10 ऑक्टोंबर रोजी समाजप्रबोधनकार भारुडे, शेळके महाराज बारामतीकर यांचे भारुड, विजयादशमी दिवशी देवीचा छबिना मिरवणूक, तसेच यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम दांडिया ,नृत्य अशा विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कार्याध्यक्ष भालचंद्र मातोळे यांनी दिली.
हा सर्व कार्यक्रम यशस्वीते साठी जय भवानी मंडळाचे बाबासाहेब मुळे, अध्यक्ष ज्ञानेश्वर बिराजदार, महादेव भोईटे, बालाजी बिराजदार, विलास करके, प्रताप लामजणे, महादेव बिराजदार, राजु लामजने, महादेव कुंभार, युवराज माने, गुंडू करके, जगनाथ बिराजदार,चिदानंद लामजने, संतोष विभुते यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी , ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.





Social Plugin