Ticker

6/recent/ticker-posts

शहाजीराजेच्या "अर्जुन बचाराम मदने याची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड



बुध   दि[ प्रकाश राजेघाटगे ]

खंडाळा येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत खटावच्या शहाजीराजे महाविद्यालयाच्या अर्जुन बचाराम मदने या इ ११वी कलांशाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने ६० किलो वजनी गटात ग्रीको कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला,त्याची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची महिती प्र प्राचार्य अरविंद येलपले यांनी दिली.

    या स्पर्धेत पारस नितीन जठार (इ १२ शास्त्र)याने ६१ किलो वजनी गटात फ्री स्टाईल प्रकारात द्वितीय तसेच श्रीराज राजेंद्र शिंदे (इ १२ शास्त्र)याने ९२ किलो वजनी गटात फ्री स्टाईल प्रकारात जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला.

  प्रा दिलीप बरकडे तसेच प्रा सुखदेव सजगने यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील, प्र प्राचार्य अरविंद येलपले, पर्यवेक्षक प्रा के बी जाधव सर्व प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी अभिनंदन केले.