मोरझाडी रणजीत तायडे
उरळ : पोलिस स्टेशन अंतर्गत डोंगरगाव शेत शिवारात मन नदी काठावर अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर उरळ पोलिसांनी धाड टाकून ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध १७ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला.
डोंगरगाव येथील एक व्यक्ती अवैधरित्या हातभट्टीची दारू काढून परिसरात विक्री करीत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अरुण मुंडे यांना मिळाली. त्यावरून उरळ
पोलिसांनी डोंगरगाव येथील मन नदी काठावर सापळा रचून धाड टाकली. यामध्ये डोंगरगाव येथील नारायण देवचंद पांडे हा हातभट्टीची दारू काढत असताना पोलिसांना दिसून आला. त्याने पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पळ काढला. या कारवाईत पोलिसांनी ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. आरोपी नारायण पांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अरुण मुंडे, संतोष गाडवे यांनी केली.





Social Plugin