बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
कोरेगाव मतदार संघ म्हणले की शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ उल्लेखला जात होता.मागच्या वेळी भाजपातुन ऐनवेळी आयात केलेले श्री. महेश शिंदे यांच्या माध्यमातून गेल्या वेळेला या मतदारसंघात भगवा फडकला परंतु पक्षातील बंडाळी नंतर ठाकरे गटाची दयनीय अवस्था या मतदारसंघात झाली आहे.पक्षातील वरिष्ठ फक्त पक्षाचा कार्यक्रम द्यायचे काम करतात पण पक्षातील नेतृत्व उभे राहील यासाठी कोणीन्ही प्रयत्न केला नाही असे खेदाने नमूद करावे लागते.२०१४ सालापासून जिल्ह्यात उपनेतेपद मिळाले त्यावेळेपासून जिल्ह्यातील थोडंफार आंदोलनाच्या माध्यमातून उभे राहिलेले नेतृत्व संपत गेले असे प्रकर्षाने दिसून येत आहे.कोणाचा कोणालाही ताळमेळ नसल्यामुळे व पक्षाचे नेते निष्क्रिय असल्यामुळे या मतदारसंघात शिवसैनिकांची बिकट अवस्था झाली आहे.आंदोलनाच्या माध्यमातून प्रकाश झोतात असलेला कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आता शांत दिसत आहे. आज पर्यंत ज्यांनी-ज्यांनी विधानसभा लढवली तो एकही नेता पक्षात राहिलेला नाही हे सत्य आता सुर्यप्रकाशासारखे सत्य आहे.
मोजके कार्यकर्ते घेऊन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी चांगला झंजावात मतदारसंघात उभा केला होता परंतु तेही सुप्त अवस्थेत गेलेले आहेत असे दिसते.उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय नलवडे, सचिन झांजुर्णे ,रमेश बोराटे प्रयत्नशील आहेत यांचेही आता संघटनात्मक काम दिसत नाही. निवडणुका जवळ आल्या की संघटनेतील काही ज्येष्ठ मंडळी मात्र वरून यात सहभाग घेतात हे कायम दिसते.काही मंडळी आमदार शशिकांत शिंदे यांच्या संपर्कात आहे तर त्यातीलच काही जेष्ठ मंडळी मातोश्रीवर नवीन उमेदवारांना घेऊन उमेदवाराची मागणी करत आहे व तेच कार्यकर्ते संध्याकाळी आमदार शशिकांत शिंदे यांच्या बंगल्यावर दिसतात या सर्व गोष्टीमुळे संघटनेत अलबेल राहिलेला नाही असे दिसते पक्ष नेत्यांनी याकडे लक्ष घालावे व पुन्हा कोरेगाव विधानसभा मतदारसंघ भगवा फडकवा अशी भावना निष्ठावंत व कट्टर शिवसैनिकांच्या कडून व्यक्त होत आहे .
गेल्या पाच वर्षात काटापूर पाणी प्रश्नासाठी झालेल्या आंदोलन,दूध प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची आंदोलने ही रस्त्यांवरची झालेली आंदोलने जनतेच्या मनात कायम राहिलेली आहेत.पण अशी आंदोलने होत होती त्यांना पक्षाकडून न मिळालेली ताकद कार्यकर्त्याला खच्चीकरणाकडे घेऊन जाते एकंदरीत असे मतदारसंघातील परिस्थितीवरून दिसते एक मजबूत असं नेतृत्व या मतदारसंघात उदयास यावं असे निष्ठावंत शिवसैनिकांना वाटते येणाऱ्या काळात या सर्व गोष्टींचा विचार संघटनेतील नेते करतील व पुन्हा एकदा या मतदारसंघात शिवसेनेचा झंजावात दिसेल असे निष्ठावंत शिवसैनिकांकडून बोलले जात आहे
.jpeg)




Social Plugin