प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव
भारताचे माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. कारण वाचन संस्कृती वृध्दीगत व्हावी, आदर्श जीवन कौशल्य विकसित व्हावी, 'वाचाल तर वाचाल !' 'ग्रंथ हेच गुरु' हा आदर्श व सुसंस्कारीत आदर्शपाठ जोपासण्यासाठी पुस्तक भेट संकल्पना ही राबवू या ! वाढदिवसाला, सत्काराला किंवा गुलाबपुष्प, बुके, हारऐवजी पुस्तक सप्रेम भेट देऊ या ! आणि एकविसाव्या शतकात वाचन संस्कृती जोपासू या !
यासाठी पिंपरखेड तांडा येथील वाडीलालभाऊ राठोड माध्यमिक आश्रमशाळेचे उपक्रमशील शिक्षक सतीश सूर्यवंशी लिखित व ज्ञानसिंधु प्रकाशन, नाशिक व्दारे प्रकाशित झालेल्या "सेल्फी विथ सक्सेस" हे मोफत पुस्तक त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांना वाचन प्रेरणा दिनी सप्रेम भेट दिले. शाळेत उपक्रम राबवून विद्यार्थांच्या सर्वांगिण विकास व शैक्षणिक गुणवत्तेसाठी दर्जेदार व उपयुक्त सेल्फी विथ सक्सेस, माझी शाळा माझा उपक्रम हे पुस्तक मोफत उपलब्ध करून देत आहे. वाचन प्रेरणा दिनी विशेष पुस्तक भेट संकल्पना ही वाचन संस्कृती टिकविण्यासाठी महत्वपूर्ण राहिल. त्यांचे विविध शाळेतर्फ प्रेरणादायी मोफत पुस्तक भेट उपक्रम राबविल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.





Social Plugin