Ticker

6/recent/ticker-posts

कारागृहातील महिला बंद्यांसाठी ध्यास फाउंडेशनचा ध्यास”


बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बोराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर व कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या विशेष परवानगीने सातारा जिल्हा कारागृहातील महिला बंद्यांसाठी ध्यास फाउंडेशन, सातारा यांच्या माध्यमातून दिवाळीसाठी आकाश कंदील बनविणे, उटणे तयार करणे व दरवाजाचे तोरण बनविणे इ. चे प्रशिक्षण देण्यात आले. 

रंगीत कागद, कागदी फुले, रंगीत लेस, आकर्षक टिकल्या, विविध रंगांच्या लेस यापासून आकर्षक कंदील व दरवाजासाठी तोरण बनवण्याचे प्रशिक्षण ध्यास फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रा. डॉ. वैजयंती ओतारी तसेच नूतन माने यांच्या संस्थेच्या माध्यमातून देण्यात आले. 

तसेच दिवाळी अभ्यंग स्नानासाठी उटणे तयार करण्याचे देखील प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये आयुर्वेदातील विविध औषधी पदार्थांचा वापर करून त्यांचे प्रमाण किती असावे,  कसे वापरावे याचे देखील प्रशिक्षण महिला बंद्यांना देण्यात आले. सदर उठणे बनवताना त्यामध्ये आवळा पावडर, आंबे हळद, वेखंड, अनंतमूळ, चंदन पावडर, नागर मोथा, वाळा, बावची, जठामानसी, ज्येष्ठ मध, कडुनिंब, लोध्र इत्यादी वस्तूंचा वापर करून उठणे तयार करण्यात आले आहे. 

सदर प्रशिक्षण कार्यक्रमास ध्यास फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर वैजयंती ओतारी, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, महिला शिपाई अश्विनी पुजारी, काजल सायमोते, रेश्मा गायकवाड, लता काळकुटे, रूपाली नलवडे, जयश्री पवार, अंकिता करपे, प्रतीक्षा मोरे, गीता दाभाडे ई. हजर होते.