बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सातारा कारागृह येथे नवरात्र महोत्सवानिमित्त नारीशक्ती फाउंडेशन, सातारा यांच्या माध्यमातून सर्व महिला बंध्यांना साडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी नारीशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीशा शहा, राधाबेन शहा,गीता भागवत, नितिराज जांभळे इत्यादी हजर होते.
त्यावेळी बोलताना सुनिषा शहा यांनी आपल्या फाऊंडेशन मार्फत तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंची माहिती दिली व महिला बंद्यांमार्फत बनविलेल्या वस्तूना बाजारपेठ मिळवून देण्याची हमी दिली, तसेच कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, हवालदार सुदाम बर्डे, अहमद संदे, रेश्मा गायकवाड, ज्योती शिंगरे, राकेश पवार, प्रतीक्षा मोरे इत्यादी उपस्थित होते.





Social Plugin