भगवान गावित (ग्रामीण प्रतिनिधी)
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर तालुक्यातील न्हावरे (ता. शिरूर) येथे एक दिवसीय ग्राम सर्वेक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबाराचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. विलास आढाव यांच्या हस्ते झाले.
ग्राम सर्वेक्षणातून हा गावच्या विकासाचे ध्येय पूर्ण करता येते. गावात उपलब्ध असणारी नैसर्गिक साधनसामुग्रीच्या बरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक संचिताचे सर्वेक्षण करून त्यातून विकासाचा नवीन आराखडा मांडता येतो. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. विलास आढाव यांनी व्यक्त केले.या शिबिरात वेगवेगळे प्रश्नावली वापरून अभ्यास करून या सर्वेक्षनाचा अहवाल पुस्तकरुपात प्रकाशित करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सांगितले.
या शिबिरात ५० विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप,डॉ. नाना झगडे, न्हावरे गावचे सरपंच सरपंच कमलताई कोकरे, प्राचार्य आर एन सानप, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव कोरेकर, सर्जेराव साठे, अमोल गावडे, रामचंद्र कोरेकर, शांताराम हांडे, शामकांत साठे, नानासाहेब कोरेकर, संभाजी बिडगर, सुभाष कांडगे,रोहिडेश्वर निंबाळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे पद्माकर भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर बाळासाहेब जाधव आभार मानले.





Social Plugin