वसमतः (दि.११) तालुक्यातील मौजे धामणगाव येथे दिनांक १० ऑक्टोबर २०२४, गुरुवार रोजी छत्रपती शिवरायांचे विश्वासू अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महाले यांची ३८९ वी जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे विभागीय कर्मचारी अध्यक्ष अशोकराव गुळगुळे, हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत राऊत, तालुका संपर्क प्रमुख कुंडलिक भंडारे, बालाजी मेहेत्रे, गणेश शिंदे, स्वप्नील काळे, सरपंच विजय बेले, उपसरपंच रामप्रसाद हरबळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष चंपतराव हरबळे, बालाजी हरबळे, सखाराम बेले, सखाराम हरबळे, राजु बेले, मुंजाजी खुळखुळे, काशिनाथ खुळखुळे, केशवराव खुळखुळे, उत्तमराव खुळखुळे, बालाजी खुळखुळे, रंगनाथ खुळखुळे, नामदेव खुळखुळे तसेच गावकरी मंडळी, युवक मंडळी आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत अनेक विश्वासू शिलेदार सोबत घेवून लढाया केल्या आणि स्वराज्य अबाधित राखले, त्यापैकीच शिवरायांचे विश्वासू शिलेदार म्हणजे जिवाजी महाले. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानासोबत जेंव्हा महाराजांची भेट ठरली तेंव्हा शिवाजी महाराजांनी गानिमांची दगेबाजपणा ओळखून आपल्यासोबत दांडपट्टा चालविण्यात तरबेज असलेल्या जिवाजी महाले यांना आवर्जून सोबत घेतले. भेटीच्या वेळी अफजलखानाने महाराजांसोबत दगा केला. पण, शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीने वाघनखाच्या साहाय्याने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. तेवढ्यात सय्यद बंडा महाराजांवर चालून आला, हे जिवाजी महालेच्या लक्षात येताच त्यांनी सय्यद बंडाचा हात वरच्या वरच दांडपट्ट्याने उडवला आणि शिवरायांचे प्राण वाचवले. त्याक्षणापासून 'होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी' असे वाक्यच प्रचलित झाले.





Social Plugin