ग्रामीण प्रतिनिधी मारोती गाडगे/कटचिंचोली
गेवराई - (बीड)दि . ११ - राजेंद्र सर यांनी दिलेल्या माहितीनुसार -केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार शासकीय पातळीवर जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिराचे गेवराई येथे आयोजन करण्यात आले होते . देशभरात व राज्यभरात जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे . त्यांचे स्वास्थ्य चांगले राहावे म्हणून वेळोवेळी त्यांची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे . या अनुषंगाने गेवराईतील जेष्ठ नागरिक समन्वय समितीने शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी गेवराई शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . निश्चित वेळेनुसार सकाळी ९ .३० वाजता आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी जेष्ठांची प्रचंड गर्दी झाली होती . शासकीय उपजिल्हा रुग्णालयात या शिबिराचा प्रारंभ डॉ .सानप (आर्थोपेडिक ), रुग्णालयाचे तंत्रज्ञ मंगेश खरात , जेष्ठ नागरिक प्रभाकर घोडके, एस . वाय . अन्सारी, प्रमोदराव कुलकर्णी, प्रल्हाद आहेर, सेवानिवृत्त पोहेको थोरात,पी. के. जाधव ,जेष्ठ पत्रकार प्रा राजेंद्र बरकसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला . दुपारी १२ वाजेपर्यंत विविध प्रकारच्या प्रयोगशाळेतील तपासण्या व आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी केली . प्रत्येक वयस्कर नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी करून तपासणी केली . रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . सुरज कोठावळे यांच्या मार्गदर्शना खाली डॉ. राजेश शिंदे, डॉ नोमानी, डॉ. सय्यद सिराज, डॉ. राजेंद्र आंधळे, डॉ. सानप, श्रीमती डॉ. लेंडगुळे, नेत्र सहाय्यक काळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सानप पी. के., मंगेश खरात, गव्हाणे मामा, महालॅबचे तंत्रज्ञ धोंगडे सुरेश, फार्मासिस्ट विजय थोरात, निवृत्ती अडागळे, नामदेव सुतार, वखरे मामा, खरात मामा यांनी आरोग्य तपासणीसाठी सहकार्य केले .यापूर्वी ३ वेळा जेष्ठ नागरिक यांची आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली होती. त्याही शिबिरात अनेक स्त्री-पुरुष जेष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.त्यापैकी बऱ्याच नागरिकांनी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेमध्ये जाऊन विनामूल्य चाचण्या केल्या होत्या आणि संबंधित डॉक्टर्सला दाखवून त्यावर औषध उपचार किंवा मार्गदर्शन घेतले होते . गेवराई उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . सुरज कोठावळे यांनी खास ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी अशा प्रकारची मोफत आरोग्य चाचणी तपासणी आयोजित केलेली आहे . ११ ऑक्टोबर रोजी संपन्न आरोग्य तपासणीचा ज्येष्ठ नागरिक स्त्री-पुरुषांनी लाभ घेतला . यावेळी जेष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र बरकसे , सीता महासाहेब, प्राचार्य राम महासाहेब , जेष्ठ नागरिक एस. वाय. अन्सारी ,प्रल्हाद आहेर ,ईश्वर आबदरे, फौजी अरुण परदेशी , दत्तात्रय इंदे , पी . के . जाधव, पोहेकॉ थोरात, सौ . अनुताई थोरात सुनिल कांडेकर यांनी शिबीर यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले .





Social Plugin