Ticker

6/recent/ticker-posts

लाडकी बहिण योजनेचे पैसे विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा परसोडी नाग यांनी केले हडप


प्रतिनिधी लाखांदूर - शैलेश कावळे 

     राज्यातील युती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करुण मीहिलाणा आर्थिक सक्षम बनविण्याचा विळा उचलला व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करणे सुरू केले असता काही बॅकानी लाडकी बहिण योजनेचे पैसे पात्र लाभार्थ्यांना न देता कर्ज खात्यात जमा केल्याने लाभार्थी बहिणी लाडकी बहिण योजने पासून वंचित राहावे लागत आहे.

     लाखांदूर तालुक्यातील राजनी या गावातील लाडक्या बहिणी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे फार्म भरले , फार्म मंजूर झाले.बहिणीच्या खात्यात पहिला हप्ता 3000 रु जमा झाले ते मिळाले आणि दुसरा हप्ता 1500 रु दिनांक 26/09/2024 रोजी जमा झाले तेव्हा लाभार्थी पैसे काढण्यासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा परसोडी नाग येथे गेले असता खात्यात पैसे नाही.तेथील शाखा व्यवस्थापक यांना विचारणा केली असता शाखा व्यवस्थापकाने उलट सुलट उत्तर दिले आणि कोर्टात टाकण्याची धमकी दिली असल्याचे लाभार्थी बहिणीने सांगितले.

  लाभार्थी यांनी सांगितले की झालेला प्रकार आम्ही मा.देवचंद भाऊ कावळे यांना सांगितले असता देवचंद भाऊ कावळे यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि भाऊंच्या मार्गदर्शनानुसार आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांना आज दिनांक 01/10/2024 रोजी मा.तहसिलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन दिले की विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा परसोडी नाग येथे लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला न देता आमचे पैसे कर्ज खात्यात जमा केले आणि आम्ही शाखा व्यवस्थापक यांना विचारणा केली असता उलट आम्हाला उलट सुलट उत्तर दिले व आम्हाला कोर्टात टाकण्याची धमकी दिली.म्हणुन आपल्या लाडक्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा आणि संबंधीत व्यवस्थापकावर कार्यवाही करावी.म्हणुन लाडक्या बहिणीने तहसीलदार लाखांदूर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना दिले निवेदन.