Ticker

6/recent/ticker-posts

सेंद्रिय शेती काळाची गरज शेतकरी प्रशिक्षण मध्ये मार्गदर्शन मा. श्री संतोषकुमार बरकडे



वाई प्रतिनीधी- राहुल पिसाळ 

महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सातारा व तालुका कृषि अधिकारी वाई यांच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजना 2024-25 मधील समाविष्ट शेतकरी गटांचे गावपातळीवरील शेतकरी प्रशिक्षण ओझर्डे ता. वाई जि. सातारा येथे मा. श्री संतोषकुमार बरकडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा.श्री संतोषकुमार बरकडे साहेब यांनी दिवसेंदिवस वाढत चाललेले कॅन्सर सारख्या आजारांचे प्रमाण पाहता सेंद्रिय शेती काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री प्रशांत शेंडे साहेब तालुका कृषी अधिकारी वाई यांनी केले यामध्ये त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी समाविष्ट होऊन आपल्या शेतीचे सेंद्रिय शेती प्रमाणीकरण करावे असे आवाहन त्यांनी केले.सदर कार्यक्रमांमध्ये तज्ञ मार्गदर्शक मा.श्री.भुषण यादगिरवार, विषय विशेषज्ञ कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव यांनी सेंद्रिय शेती मध्ये जैविक निविष्ठा निर्मिती, टेन ड्रम थेअरी जैविक कीड व रोग नियंत्रण, बीज प्रक्रियेचे महत्त्व, जीवामृत, घन जीवामृत, दशपर्णी अर्क,लेंडी खत,व्हेम, मायकोरायझा, इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन केले. श्री प्रदीप देवरे, बी टी एम वाई यांनी गट स्थापना, नैसर्गिक शेती चे महत्त्व या बाबत मार्गदर्शन केले व डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेबाबत सखोल मार्गदर्शन केले.

       सदर कार्यक्रमांमध्ये कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून उत्पादन वाढीमध्ये मोलाची कामगिरी केल्याबद्दल श्री संतोष नेवसे, कृषि सहाय्यक, ओझर्डे यांचा ओझर्डे ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास मा.श्री रविंद्र बेलदार मंडल कृषि अधिकारी वाई, माननीय श्री. सुरेश फरांदे चेअरमन वि.का.स सोसायटी ओझर्डे, कृषि पर्यवेक्षक श्री माणिक बनसोडे व श्री.किरण बाबर, कृषि सहाय्यक ओझर्डे- श्री संतोष नेवसे, श्रीमती अश्विनी मोरे, श्रीमती एम. आर नाडेकर, श्री. धनाजीराव पिसाळ,श्री. अविनाश फरांदे,श्री.संदीप बाजीराव पिसाळ,भगवानराव धुमाळ,विद्याधर जाधव. संदीप गुरव, मनोज पिसाळ, सचिन आनंदराव पिसाळ, मालोजीराव पिसाळ, किरण पिसाळ, अनिल पिसाळ,पांडुरंग पिसाळ,नागेश कोठावळे, शामराव वाघ,अर्जुन फरांदे, महादेव फरांदे, दीपक फरांदे, संतोष यादव,नंदकुमार फरांदे, उमेश इटगी, अजित फरांदे, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या गटातील शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमचे सूत्रसंचालन श्री. संतोष नेवसे यांनी केले व आभार श्री. मच्छिन्द्र कोदे पोलीस पाटील ओझर्डे यांनी केले.