वाई प्रतिनीधी - राहुल देशमुख.
खंडाळा तालुक्यातील वारकरी, किर्तनकार, प्रवचनकार यांसाठी कार्यरत असलेल्या श्री विठ्ठल भक्त खंडाळा तालुका वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी हभप अॅड. गजेंद्र मुसळे (सुखेड) व उपाध्यक्ष हभप जालिंदर जाधव (कर्नवडी) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. खंडाळा तालुक्यात वारकरी शिक्षण संस्था सुरू करणे व वारकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्यरत राहण्यास व वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नूतन अध्यक्ष ह.भ.प. ऍडव्होकेट गजेंद्र मुसळे यांनी सांगितले.
गत पंचवार्षिक विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष हभप सत्वशील शेळके, उपाध्यक्ष शामराव पवार, सचिव हभप शंकरराव मर्दाने, खजिनदार हभप रमेश ढमाळ यांचा कार्यकाल संपल्यामुळे नूतन कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. इतर कार्यकारिणी सचिव हभप विजय भोसले (शिवाजीनगर) खजिनदार हभप अमित सुतार (अंदोरी) आणि विश्वस्त हभप नंदकुमार रासकर (पाडळी), रामचंद्र शेळके (लोणंद), शरद देशपांडे (भादे), धनंजय धायगुडे (बाळूपाटलाचीवाडी), जयवंत पठाडे (कण्हेरी), विठ्ठल ढमाळ (पारगाव), चेतन फडतरे (बावडा), चंद्रकांत पाटील (अतिट), राजू पाटील (कोपर्डे) यांचा समावेश आहे.
तालुक्यातील किर्तनकार यांना प्राधान्याने संधी मिळावी तसेच ज्येष्ठ कलाकार यांना शासकीय मानधन प्राप्त होण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणे.यावेळी माजी अध्यक्ष हभप सत्वशील शेळके, डॉ.नितिन सावंत,हभप जालिंदर धायगुडे, हभप संतोष जाधव, हभप शंकरराव मर्दाने, हभप जयवंत यादव, हभप अर्जुन शेळके, हभप रविंद्र सोनावळे, हभप सोपान पडळकर, हभप वेदपाठक, हभप आप्पा पडळकर, दगडू धायगुडे, अंकुश ननावरे, अरविंद ननावरे, हभप धुळा कराडे, हभप विशाल क्षीरसागर, शिवाजीराव भिसे उपस्थित होते.





Social Plugin