आजपर्यंत एकूण 2404 फाईल मंजूर
------- देगलूर - प्रतिनिधी - जावेद अहमद
देगलूर : श्रावण बाळ व गांधी निराधार योजनाच्या अध्यक्ष पदी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील यांची नियुक्ति नंतर देगलूर तहसील मध्ये संबधित विभागाच्या कामात मोठी गती व पारदर्शकता आली असून संतोष पाटील यांनी या योजनेचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांना मिळावा यासाठी अविरत कष्ट घेत देगलूर तहसीलच्या प्रत्येक गावात सदरील योजनाचे लाभ घेण्याचे आवाहन केले.
दरम्यान देगलूर तहसीलमध्ये एकुण 659 फाइली तहसील कार्यालयाच्या संगांनी व श्रावण बाळ योजना विभागाला प्राप्त झाले होते.यामधून 652 फाइल मंजूर करण्यात आले. यात संजय गांधी निराधार योजना चे 161 आणि श्रावण बाळ योजना चे एकूण 491 फाइली मंजूर करण्यात आले.
सन १९८० साली संजय गांधी निराधार योजना ची स्थापना करण्यात आली होती. जवळपास गेल्या 44 वर्षानंतर इतक्या मोठ्या संख्याने या योजनेचा लाभ लोकांना मिळाला आहे.सदरील माहिती संजय गांधी निराधार योजना चे अध्यक्ष संतोष पाटील आणि सचिव तहसीलदार भरत सुर्यवंशी यांनी दिले असून सदरील दोन्ही योजनांचे लाभ लाभार्थ्यांना मिळाले पाहीजे यासाठी धडपडणारे, विनाविलंब सर्वसामान्यांना सहकार्य करणारे अध्यक्ष म्हणून संतोष पाटील यांची संपूर्ण तालुक्यातून कौतूक होत आहे.
यापूर्वी तालुक्यातील एकूण 1748 जणांच्या फाईली मंजूर झाल्या असून आता 652 फाईली मंजूर झाल्या आहेत. म्हणजे आज पर्यंत *एकूण 2404 जणांच्या* फाईली मंजूर करून देण्याचा विक्रम संतोष पाटील यांनी केला आहे.संतोष पाटील यांनी स्वतः सर्व गोष्टींची काळजी घेत खऱ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळवून दिला आहे.
संतोष पाटलांनी या लक्षणीय संख्येच्या लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले असल्याचे आवर्जून सांगितले.





Social Plugin