Ticker

6/recent/ticker-posts

मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे डिजिटल क्लासरूम चे उद्घाटन



अंबड तालुका प्रतिनिधी मयुर वाव्हळ 

घनसावंगी तालुक्यातील मच्छिद्रनाथ चिंचोली येथील मत्स्योदरी प्रशालेत शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी डिजिटल क्लासरूम आणि लॅबचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी व मुख्याध्यापक राहुल भालेकर हे होते. चिंचोली पंचक्रोशीचे धार्मिक योगीनाथ कैलास महाराज हेमके यांचीही कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.

कंपनीचे सहसंचालक विलास बळीराम घोगरे यांच्या प्रयत्नातून शाळेसाठी १६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. या निधीतून शाळेत पाच स्मार्ट क्लासरूम तसेच डेल कंपनीचे १५ डेस्कटॉप कम्प्युटर्स उपलब्ध करून देण्यात आले. या प्रकल्पामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा मिळणार असून, त्यांच्या शिक्षण पद्धतीत क्रांतिकारी बदल होईल. घोगरे यांनी अल्पावधीतच आपल्या मूळ गावातील शाळेला तांत्रिक सुविधांनी सज्ज केले आहे. या उपक्रमामुळे शाळेला जागतिक पातळीवर शिक्ष  ाणाचे दालन खुले झाले आहे. कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध संस्थांचे प्रमुख, शिक्षणप्रेमी आणि पालक-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.