Ticker

6/recent/ticker-posts

वन्यप्राणी उठले शेतकऱ्यांच्या जिवावर! शेतकरी त्रस्त रात्रभर शेतातच मुक्काम



राजकुमार चिंचोळकर बाळापूर 

आजमितीला रब्बी हंगामातील पीकांची पेरणी जवळपास अंतिम टप्प्यात असून परिसरात मोठ्या प्रमाणात सुळसुळाट असलेले वन्यप्राणी उगवलेल्या बियाण्याचे अंकुर फस्त करीत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त असुन वन्यप्रान्या  पासून पीकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांवर शेतात रात्र जागून काढण्याचा प्रसंग ओढवला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे सध्याच्या परिस्थितीत रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पीका मध्ये गहू.कांदा तसेच अधिक प्रमाणात पेरणी करण्यात आलेले हरभरा पिकाची पेरणी जवळपास अंतिम टप्प्यात असून पेरणी करण्यात आलेल्या बियाण्यांचे अंकुर जमीनी बाहेर डोकावत असल्याचे चित्र दिसून येत आहे परंतु अलीकडच्या कालावधीत वन्यप्राण्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात असुन रात्रीच्या सुमारास वन्यप्राण्यांचे भलेमोठे कळप शेतातील हरभरा गहू तसेच ईतर पिके फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्रभर शेतातच मुक्काम करून वन्यप्राणी यांच्या पासून पीकांचे रक्षण करण्याची वेळ निर्माण झाली आहे.

 मुळात खरीप हंगामातील पीका पासून समाधान कारक उत्पादन मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असताना रब्बी हंगामातील पीकांची वन्यप्राणी नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत असल्याची वास्तविकता समोर येत आहे सोबततच पिकांचे ओलीत व्यवस्थापन करीत असताना मध्ये विद्युत भारनियमन शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये  काही भागात आठवड्यातील तिन दिवस तर काही भागात चार दिवस दिवसात विद्युत पुरवठा राहतो तर उर्वरित दिवसात रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा राहतो

 त्यामुळे रात्रीच्या वेळी सुद्धा ओलीत करण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे तर कृषी पंपाला पूर्ण दिवस विद्युत पुरवठा करण्यात येणार असल्याची शासनाकडून करण्यात आलेल्या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे तसेच मुक्त संचार असलेल्या वन्यप्राणी यांचा वनविभागाकडून बंदोबस्त करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे