बुध दि [प्रकाश राजेघाटगे]
पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून निढळ ते वर्धनगड असा सुमारे १४ किलोमीटरचा आणि पुसेगावच्या मुख्य बाजारपेठेतून जाणारा सातारा - लातूर राष्ट्रीय महामार्ग हरित करण्याच्या उद्देशाने सद्या जोरदार प्रयत्न सुरू असून येत्या काही दिवसांत हा रस्ता वृक्ष लागवड आणि ट्री गार्ड सह पूर्ण होईल असा विश्वास श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट चे चेअरमन डॉ सुरेश जाधव यांनी व्यक्त केला.वाढते औद्योगीकरण आणि प्रदूषण यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड आणि त्यांचे जतन ही काळाची गरज असल्याचे मत श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी व्यक्त केले.
येथे वर्धनगड-पुसेगाव-निढळ या १४ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा पाच हजारांहून अधिक सावली देणाऱ्या वृक्ष लागवडीचा उपक्रम येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट व सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. यात वारकरी संप्रदायाच्या अनेकानी मोलाचे सहकार्य केले आहे.वड पिंपळ करंज आदी सह सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड रस्त्याच्या दुतर्फा कऱण्यात येत आहे, चरायला येणारी जनावरे तसेच अन्य माध्यमातून लावलेल्या झाडांची जोपासना व्हावी म्हणून सर्वच झाडांना ट्री गार्ड लावण्यात आले आहे, तसेच झाडांना टँकरच्यामाध्यमातून पाणीपुवठा कऱण्यात येत आहे.तसेच अद्याप ही काही ठिकाणी लागवड करण्यासाठी राहिलेल्या झाडांच्या रोपांना देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून पाणी देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे
या कामाची पाहणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली .यावेळी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ सुरेश जाधव, माजी चेअरमन रणधीर जाधव विश्वस्त बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख,गौरव जाधव आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. जाधव म्हणाले, "रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ अशा अनेक सावली देणाऱ्या विविध वृक्षांच्या जातींच्या प्रजाती बहरल्या, तर सावलीचा रस्ता म्हणून वर्धनगड पुसेगाव निढळ हा रस्ता ओळखला जाईल. या वृक्ष लागवडीमुळे संबंधित गावे आणि महामार्गाच्या शोभेत देखील भर पडेल."





Social Plugin