Ticker

6/recent/ticker-posts

पराभवाचे आत्मचिंतन करा, आगपाखड निरर्थक


   युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांचा विरोधकांना सल्ला, चौफेर विकासकामांमुळे सर्वच विभागात मोठी आघाडी

बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघात विद्यमान आमदार महेश शिंदे यांनी अभूतपूर्व विजय मिळवला. खटाव भागातही वर्चस्व राखले. विसापूर (ता. खटाव) मध्ये पण विरोधकांचे वर्चस्व असताना आमदार महेश शिंदे गटाने मताधिक्य घेतले. येथील युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांनी विरोधी माजी पदाधिकाऱ्यांना 'पछाडत' आमदार महेश शिंदे यांच्या विजयात वाटा उचलला. तर दुसरीकडे विरोधकांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. त्यावर आमदार महेश शिंदे यांनी विसापूर पंचक्रोशीचा चौफेर विकास केला आहे. त्यामुळेच त्यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. विरोधकांची ईव्हीएमवरची आगपाखड निरर्थक आहे. त्यांनी पराभवाचे आत्मचिंतन करावे, असा सल्ला हरिश्चंद्र सावंत यांनी दिला आहे.

हरिश्चंद्र सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या आमदार महेश शिंदे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. खटाव तालुक्यातील विसापूर पंचक्रोशीतील सर्व गावांमध्ये आमदार महेश शिंदे यांना मताधिक्य आहे. विसापूरसह पंचक्रोशीतील गावांसाठी आमदार महेश शिंदे यांनी मोठा निधी आणून विकासकामे मार्गी लावली आहेत. या विकास कामांमुळेच आमदार महेश शिंदे यांना मताधिक्य मिळाले आहे. पण विरोधक मात्र ईव्हीएमवर खापर फोडत आहेत. विसापूरमध्ये आमदार महेश शिंदे यांना २२२ मतांचे तर रेवलकरवाडीत २४४ एवढे मताधिक्य आहे. एकूण विसापूर परिसरात आमदार महेश शिंदे यांना ४६६ मतांचे लिड आहे. येथील बुथ क्रमांक ३१७ मध्ये ४७ मतांनी आमदार महेश शिंदे पिछाडीवर आहेत. ईव्हीएम चुकीचे म्हणता तर ही आघाडी कुठून आली. लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांना या विभागातून १६२

मतांचे लिड आहे. त्यावेळी ईव्हीएम ठिक होते. मग आताच ईव्हीएम चुकीचे कसे. ज्या मतदारांनी तुमच्या पारड्यात मते टाकली आहेत. त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखा हा प्रकार आहे. खरंतर 'नियोजन' करणाऱ्यांचे 'नियोजन' फसले असल्याचे सिद्ध झाले आहे. ईव्हीएम हैंक होऊ शकत नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे विरोधकांची ईव्हीएम बाबत आगपाखड निरर्थक आहे. विरोधकांना राजकीय पदे मिळाली. पण त्यांना विकास करता आला नाही. त्यामुळे त्यांनी पराभवाचे आत्मचिंतन करायला हवे, असे हरिश्चंद्र सावंत यांनी सांगितले.