Ticker

6/recent/ticker-posts

अमित शहा विरोधात शेवगाव सर्वपक्षीय दलित संघटनेसह भीम सैनिकाचे आंदोलन


प्रतिनिधी - शौकत शेख 

शेवगाव- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याच्या निषेधार्थ देशात व राज्यात सर्वत्र  आंबेडकरी जनतेतून मोठा असंतोष निर्माण झालं असून शेवगाव तालुक्यातील सर्व पक्षीय दलित संघटनेच्या वतीने व आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीने त्रिव स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात आले आहे सर्व दलित संघटनेसह आंबेडकरी जनता शेवगावात एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर आंबेडकर च्या पुतळ्याला हार घालून हातात निळे झेंडे व डॉक्टर आंबेडकरांची प्रतिमा हातात घेऊन तसेच अत्यविधी निघाले

 नंतर जे मडके वापरले जाते तसे मडके हातात घेऊन अमित शहाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत असंख्य नागरिकांचा मोर्चा एसटी स्टँड समोरील क्रांती चौकापर्यंत आला व त्या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली या निषेध सभेत काँ संजय नांगरे. भाऊ वाघमारे. अरुण घाडगे. प्रकाश बापू भोसले. पवन कुमार साळवे. संतोष पटवेकर. अशोक शिंदे . शाहूराव खंडागळे. किसनराव चव्हाण. घाडगे ताई. या सर्वांनी अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जे वक्तव्य केले आहे त्या वक्तव्याच्या विरोधात खरपूस समाचार घेत निषेध नोंदवला असून त्यानंतर मोर्चास आणलेले मडके फोडून मोर्चेकरी बोंबललेले आहेत या मोर्चात शेवगाव शहरासह तालुक्यातील सर्वपक्षीय दलित संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच महिला पुरुष व आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसाचा मोठा बंदोबस्त तैनात  करण्यात आला