Ticker

6/recent/ticker-posts

अंबड येथे २५० ब्रास वाळू जप्त, महसूलची कारवाई सलग दुसऱ्या कारवाईने दणाणले धाबे..


अंबड तालुका प्रतिनिधी मयुर वाव्हळ 

जालना : अंबड शहरापासून जवळचअसलेल्या डावरगाव शिवारातील गट नंबर १२० येथे २५० ब्रास वाळू साठा महसूलच्या जिल्हास्तरीय पथकाकडून जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या नेतृत्वातील पथकाने मंगळवारी केली. अवैध वाळू जप्त करण्यात आलेली आहे.अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या नेतृत्वात पथक कार्यरत करण्यात आलेले आहे. या पथकाकडून सोमवारी अंबड तालुक्यातील गोंदी येथील गोदावरी नदीपात्रात छापा टाकण्यात आला. होता. यावेळी अवैध उत्खनन व वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर व ११ केणी जप्त करण्यात आल्या होत्या. मंगळवारी देखील अंबड शहरापासून जवळ असलेल्या डावरगाव शिवारातील गट नंबर १२० मध्ये साठा करून ठेवलेली अवैध वाळू जप्त

करण्यात आली. या कारवाईत २५० पेक्षा अधिक ब्रासचा वाळू साठा जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनात अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, नायब तहसीलदार उढाण, सहायक महसूल अधिकारी बालाजी पापूलवाड, महसूल सहायक संतोष खरात, वाहनचालक योगेश कुरेवाड, तलाठी श्रीनिवास जाधव, महसूल सहायक अशोक बडवणे यांनी केली.