Ticker

6/recent/ticker-posts

वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या देशी बनावटीचे पिस्टल आणि काडतुसे केली जप्त.



वाई प्रतिनिधी- राहुल देशमुख.

            सदरची घटना अशी की वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगांवकर यांस त्यांच्या खास बातमीदारांमार्फत बातमी प्राप्त झाली की एक सराईत आरोपी हा वाई पोलीस ठाणे हद्दमधील रविवारपेठमधील मांगखळी येथे विनापरवाना अग्निशस्त्र देशी बनावटीचे पिस्तूल घेउन फिरत आहे. सदर माहिती प्राप्त होताच वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व त्यांचे पथकास सदर माहितीच्या अनुषंगाने सापळा रचुन सदर संशयित आरोपीस ताब्यात घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. प्राप्त बातमीच्या आधारे वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने रविवारपेठ वाई मधील मांगखळी येथील मणेश्वर ओढ्याचे जवळ सापळा लावला असता सदर ठिकाणी एक इसम हा संशयित रितीने फिरतांना दिसला त्याचा वाजवी संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता,त्याने त्याचे नाव *कुणाल सकटे* रा. रविवारपेठ वाई ता. वाई जि सातारा असे असल्याचे सांगितले त्याचेवर यापुर्वी देखील गुन्हा दाखल असल्याने तपासपथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता,त्याचे कमरेला ०१ देशी बनावटीचे पिस्टल व त्याचे पॅन्टचे खिशात ०२ जिवंत काडतुसे असा एकुण ६५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याचेकडुन हस्तगत करण्यात आला आहे.

सातारा जिल्हा पोलीस दलाकडून माहे नाव्हेंबर २०२२ पासून ते आज अखेर १०७ देशी बनावटीची पिस्टल ०४ बारा बोअर बंदुका,२३५ जिवंत काडतुसे, ३८३ रिकाम्या पुंगळ्या व ०४ मॅग्झीन जप्त करण्यात आलेल्या आहेत

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक सो श्री. समिर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो श्रीमती वैशाली कडुकर मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री श्याम पानेगांवकर परि. पोलीस उपअधिक्षक वाई पोलीस ठाणे.सहा पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपासपथकाचे प्रमुख पोलीस उप-निरीक्षक श्री. सुधिर वाळुंज, पोलीस उपनिरीक्षक ए.बी.सुर्वे पोलीस अंमलदार प्रसाद दुदुस्कर, पो.शि.नितीन कदम, पो.शि.राम कोळी, पो.शि हेमंत शिंदे, पो. शि श्रावण राठोड, पो. शि विशाल शिंदे यांनी केली आहे. मा पोलीस अधिक्षक साो श्री समीर शेख व मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो श्रीमती वैशाली कडुकर मॅडम यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अभिनंदन केले आहे.