Ticker

6/recent/ticker-posts

शालेय गणित विज्ञान प्रदर्शनातून भावी वैज्ञानिक तयार होते-अमोल कोतकर


प्रतिनिधी-शौकत शेख 

शेवगाव शालेय स्तरावरील गणित विज्ञान प्रदर्शनातून आपल्या मनामध्ये संकल्पना. कौशल्य दाखवण्याचे सुवर्णसंधी बाल वैज्ञानिकांना प्राप्त होत असते गणित विज्ञान प्रदर्शनातून भावी  वैज्ञानिक होतील असे मत शेवगाव आगारप्रमुख अमोल कोतकर यांनी व्यक्त केली आबासाहेब काकडे व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित गणित विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून शेवगावचे उद्योजक रितेश जाजु. प्राचार्य संपतराव दसपुते. सुनील आव्हाड. हरिचंद मडके. ज्येष्ठ गणित शिक्षक अविनाश भागवत उपस्थित होते विद्यालयातील गणित विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात गणित विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते बाल वैज्ञानिकांनी गणित विज्ञान विषयाचे 200 हून अधिक मॉडेल्स प्रतिकृती तयार केले होते

या बाल वैज्ञानिकचे व मार्गदर्शक शिक्षकाचे कौतुक शुभेच्छा दिल्या तसेच या पसंगी नुकतीच इस्रो सहल करून परतलेले कुमारी गौरी कंटाळे. तसेच जिल्हा विज्ञान परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा कातोरे. कुमारी श्रेया देशमुख. या विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला गणित विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी कौशल्य धोंडे. अविनाश भागवत.  ज्ञानेश्वर आबाडे. दिपाली सुसे. स्वाती शहाणे. रागिनी लबडे . सुरज लबडे. भानुदास बांडे. योगिता औटी. व सतीश वावरे यांनी घेतले विशेष परिश्रम घेऊन प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षक कर्मचारी यांचे खूप सहकार्य लाभले