बुध, दि. [ प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील बुध गावचे सुपुत्र वैभव राजेघाटगे यांची मुख्यमंत्री कार्यालयात सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोषागार अधिकारी ते वित्त उपसचिव अशा विविध पदांवर त्यांनी आपल्या स्वतंत्र कार्यशैलीचा ठसा उमटविला. त्यांचा हा प्रवास केवळ प्रेरणादायीच नव्हे, तर दिशादर्शक ठरणारा आहे. वडील जलसिंचन विभागात अभियंता असल्यामुळे सततच्या बदल्यां. म्हणून विविध ठिकाणी व ग्रामीण भागात त्यांचे शिक्षण झाले. बुधची शाळा चांगली होती. दहावीत पहिला क्रमांक मिळविला.
बारावीसाठी कराडला सायन्स कॉलेजमध्ये आले. त्यांनी बी. एस्सी. व एम. एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) केलं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दोन प्रयत्नांना यश मिळाले नाही. नंतर त्यांची महाराष्ट्र वित्त व लेखा वर्ग १ अधिकारी महणून निवड झाली आणि सिंधुदुर्गमध्ये कैको म्हणून रुजू झाले. कामाकडे सकारात्मकतेने पाहणे आणि कायद्याच्या चौकटीत राहुन काम करणे, हे त्यांचे वैशिष्टय. चांगल्या कामाचं बाळकडू त्यांना सिंधुदुर्गमध्ये मिळालं, वित्त विभागाचं रेकॉर्ड खूप वर्षे अडगळीत होतं. राजेघाटगे यांनी सुटीच्या दिवशी सर्व सहकाऱ्यांना बोलावून रेकॉर्ड व्यवस्थित लावलं. रेकॉर्ड रूम नेटकी केली. त्यांच्या या कामाची दाखल तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी भिडे पांनी घेतली. शरम् गोखले तेव्हा कोकण आयुक्त होत्या. अश्विनी भिडेंनी कोकण आयुक्तांना वित्त विभागाची रेकॉर्ड रूम आवर्जून दाखवली. त्यांची बदली सांगलीला झाली. राजेघाटगे यांनी विभाग पातळीवर क्रीडा स्पर्धा सुरू केल्या. पुढे राज्य पातळीवर अशा स्पर्धा होऊ लागल्या. त्यावेळी राजेघाटगे यांनी सांगली वित विभागात सुरु केलेल्या 'फाईव्ह बंडल सिस्टीम च्या कामाची विशेष दखल घेतली गेली.
सांगलीनंतर सातारा येथे जिल्हा कोषाधिकारी म्हणून आल्यावर संगणकीकरणाचे काम आणि नवी इमारत चांगल्या पद्धतीने तयार केली. सातारा देशरी ऑफीस आजही राज्यातील मॉडेल ट्रेझरी म्हणून समजली जाते. 'ट्रेझरी नेट' उपक्रम पायलट प्रोजेक्ट सातारमध्ये यशस्वी केल्यामुळे राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये ट्रेझरी नेट' सुरू करण्याची जबाबदारी राजेघाटगे यांनी यशस्वी केली. सातान्यातून त्यांची पुन्हा सांगली जिल्हा परिषदेत बढ़तीवर बदली झाली. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निधी मागणी प्रक्रियेत त्यांनी सकारात्मक बदल करत सादरीकरण तयार केलं. तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी ते पाहून दाखवलं. हे सादरीकरण मंत्रालयात दाखवा, आदेश काढतो, अशी सूचना केली. आता राजेघाटगे यांना मुख्यमंत्री कार्यालयात जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे तिथेही ते प्रभावी कामगिरी करतील, अशा विश्वास व्यक्त होत आहे.





Social Plugin